
लातूर : धुळ, दुर्गंधी, अस्वच्छता, बसण्यासाठी अपुरी सुविधा... अशा वेगवेगळ्या समस्यांनी लातूरमधील मध्यवर्ती बसस्थानक घेरले गेले आहे. तक्रारी सांगूनही त्याची दखल एसटी महामंडळाकडून घेतली जात नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा कायापालट कधी होणार, असा सवाल आता प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.