
लातूर : ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ अशी आपल्याकडे म्हण आहे. या म्हणीला प्रत्यक्षात खरे करून दाखवले ते लातूरमधील सायकलीस्ट संजय चंद्रकांत महाजन यांनी. वयाच्या साठीत तब्बल एक लाख किलोमीटर सायकलिंग पूर्ण करून त्यांनी नवा रेकॉर्ड रचला आहे. हा रेकॉर्ड करून त्यांनी नव्या सायकलपटूंना आणि तरुणांना आरोग्याप्रति जागरुकतेचा संदेश दिला आहे.