Laxman Hake
sakal
बीड - बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न चव्हाट्यावर आणण्यासाठी आता आंदोलकही टोकाच्या भूमिकेवर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. बीड दौऱ्यावर असलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे चक्क ४५ फूट खोल कोरड्या विहिरीत उतरून भीषण पाणीटंचाईचे जिवंत वास्तव जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.