गेवराई - विधानसभा निवडणूक होताच न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून गेवराईतील पवार आणि पंडित काका पुतणे असा पून्हा एकदा तिरंगी सामना गेवराई करांना पाहण्यास मिळणार असे बोलले जात आहे.
नगर परिषदेवर भले पवार घराण्याचे वर्चस्व असले तरी, येत्या निवडणुकीसाठी माजी आमदार अमरसिंह पंडित व त्यांचे बंधू आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई पोखरली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती रचना झाली.यात म्हणावा तसा बदल झाला नाही. पाचेगाव गटाऐवजी आता नविन पाडळसिंगी जिल्हा परिषदेचा गट झाला आहे. जिल्हा परिषदेचे नऊ तर पंचायत समितीचे आठरा गण कायम आहेत.