नव्या नाट्यगृहाची पायाभरणी; जुन्याच्या जीर्णोद्धाराची प्रतीक्षा

नवीन नाट्यगृह इमारतीच्या पायाभरणीचे काम जोरात सुरू झाले आहे.
नवीन नाट्यगृह इमारतीच्या पायाभरणीचे काम जोरात सुरू झाले आहे.

परभणी : महापालिकेच्या अल्पबचत भवन परिसरातील नवीन नाट्यगृह इमारतीच्या पायाभरणीचे काम सध्या तरी जोरात सुरू झाले आहे. विहीत कालावधीत ही इमारत पूर्ण व्हावी व शहरातील नाट्यकलावंतांना व्यासपीठ व नाट्यप्रेमींना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्या सोबतच पालिकेने नटराज रंगमंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामदेखील हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

शहरातील महापालिकेचे नटराज रंगमंदिर गेल्या पाच ते सात वर्षांपासून बंद असून त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक चळवळ मोडकळीस आली आहे. हौशी नाट्यकलावंत जिथे जागा मिळेल तेथे कसाबसा सराव करून आपली भूक भागवतात व विविध नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी होतात. परंतु, नाट्यप्रेमींची सांस्कृतिक भूक मात्र भागत नसल्यामुळे नाट्यसंस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकाराने शहराला नवीन नाट्यगृह मंजूर झाले. परंतु, त्याचे कामदेखील विविध कारणांनी मोठ्या कालावधीसाठी रखडले. ते कसेबसे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुरू झाले परंतु, कामाने गती घेतली नव्हती. आता मात्र, पायाभरणीचे काम जोरात सुरू आहे.

निखील कन्स्ट्रक्शन पुणे
पुणे येथील या कंपनीला नाट्यगृहाच्या इमारतीचे काम देण्यात आले आहे. या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी १८ कोटी रुपये मान्यतेस्तव ठेवलेले असून ता. १२ मार्च २०१८ रोजी १४ कोटी दहा लाख ८९ हजार ८७७ रुपयांच्या कामास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत या बांधकामासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले असून एकूण अपेक्षित खर्च दहा १४ कोटी ८९ लाख ८७७ रुपये आहे. निखील कन्स्ट्रक्शनची १५ कोटी २६ लाख ४२ हजार २४० रुपये ३५ पैसे दराची निविदा या कामासाठी पात्र ठरली होती. परंतु, स्थायी समितीने चालू दरसूचीनुसार काम करण्याची मान्यता दिल्यामुळे या एजन्सीने जून २०१९ मध्ये १३ कोटी ६१ लाख ६१ हजार ८५१ रुपये ३४ पैसे या सुधारित दराने काम करण्यास संमती दर्शविली. हा दर टेस्टिंग चार्जेस वगळून, तसेच जीएसटीच्या अटीनुसार असल्याचे समजते.


पालिकेला बसू शकतो भूर्दंड
जिल्हा क्रीडा संकुलअंतर्गत बहुउद्देशीय सभागृहाच्या समोर सर्वे नं. ३६६ चा भाग असलेल्या अल्पबचत भवन परिसरात नाट्यगृहाची पायाभरणी जोरात सुरू झाली आहे. मोठ्या व अवजड यंत्रांच्या माध्यमातून पाया भरणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. हीच गती कायम राहिली तर विहीत मुदतीत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर अन्य विकासकामांप्रमाणे पुढे हे कामदेखील रखडले, तर वाढीव कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड पालिकेला बसू शकतो.


हेही वाचा  व पहा : Video : ग्रामीण विद्यार्थ्यांना सापडला यशाचा मार्ग ​

नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करा
नविन नाट्यगृह आता होईल. परंतु, खुराडा झालेल्या व परभणीचे एकेकाळी वैभव असलेल्या व राज्यातील नटश्रेष्ठांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नटराज रंगमंदिराच्या जीर्णोद्धाराची पालिकेने सुरवात करावी. लोकप्रतिनिधींनी आता यातील राजकारण काढून जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करून द्यावा. नाही तर पालिकेने कर्ज काढून, स्वनिधीतून या मोडकळीस आलेल्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com