आहारातील रानभाज्यांचे काय आहे महत्व, जाणून घ्या युवराज शहारे यांच्याकडून

file photo
file photo

हिंगोली : साधारणपणे पावसाची रिपरिप सुरु झाली की, रानभाज्या बाजारात डोकावू लागतात या भाज्यांच्या चविची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले लोक त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्या जातात. रानभाज्यांचे महत्व लक्षात यावे यासाठी रानभाज्याचे उत्सवही साजरे केले जात असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प उपसंचालक युवराज शहारे यांनी दिली आहे.

श्री . शहारे म्हणाले की, कुपोषन मुक्तीमध्ये या भाज्यामधील घटकद्रव्यांचा आवर्जुन विचार करायला हवा हा आग्रही वाढत आहे. पावसाळयात जंगलात, डोंगराळ भागामध्ये व शेतशिवारात या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदीवासी महिला व ईतर शेतकरी बाजारात त्या विक्रीसाठी घेवून येतात. यातील काही भाज्यामध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत तर त्यातुन विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे यातील काटेरी प्रकारातल्या काही भाज्या काढल्यावर त्या खडयांचे मिठ घालुन उकळवून घेतल्या जातात. काही रानभाज्याच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरुन त्यांची  विषारी- बिनविषारी गटात वर्गीकरण केले जाते.

या भाज्याविषयी जास्त अचुक माहिती असते

रानभाज्याबदल पुरेशी माहिती नसल्यामुळे ईच्छा असूनही अनेकाकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेतांना शक्यतो स्थानिक आदिवासीकडून त्या घ्याव्यात त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना या भाज्याविषयी जास्त अचुक माहिती असते. ज्या भाज्यामध्ये पानाचा समावेश अधिक आहे या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकडून ते पाणी टाकुन द्यावे त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यामधील अंगभुत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पध्दतीने वाढलेल्या असतात त्यामुळे यात खते किंवा किटकनाशके वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही उकडून केलेल्या भाज्यामध्ये शक्येतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.

कोंब आलेली भारंगी, शेकट्याच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात

रानभाज्याचे मध्ये क्लोरोफिल नावाचे घटकद्रव्य भरपूर प्रमाणात असते ते पचनसंस्थेसह शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. या ऋतुमध्ये रानभाज्याचे सेवन केल्यामुळे त्याचे शरीराला दिर्घकाळ आरोग्यदायी लाभ होतात. काही भाज्या थंड तर काही भाज्या उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळी सारख्या रानभाज्या आवर्जुन खालल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. तर रानकेळ्यामध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळयाची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट तुरट चविची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्याच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूच ची भाजी ही गवतासारखी असते त्यामुळे या अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात हा फरक सरावाने ओळखता येतो. शेवळ म्हणजे पांढऱ्या मशरुमचाच एक महत्वाचा प्रकार आहे. यात सेक्रोमायसीस इस्ट अधिक असते. अन्य भाज्यामध्ये ही या इस्टचा नैसर्गिक थर असतो.

या भाज्यामध्ये लोह, खनिज यांचा भरपूर

संक्रोमायसीसच्या अतिरिक्त थरामुळे घशात खवखव होते. खाज आल्यासारखे वाटते. त्यामुळे या भाजीसोबत विक्रीला ठेवली जाणारी फळे ही विकत घ्यायला हवित. त्यामुळे खवखवीसारखी लक्षणे नष्ट होतात. या भाज्यामध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्याचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसात शाकाहारी वा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घ्यायला हवा.

भाज्यामध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅलशियम यांचे प्रमाण अधिक असते

औषधी गुणधर्म देखील आहेत पातेरे, भारंग, बिडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. ज्या रानभाज्या पानाचा रंग गडद असतो. त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र त्यात पोष्टीक गुणधर्मही अधिक असतात या भाज्याही उकडून शिजवल्या जातात करटोली सारख्या काटेरी फळ असणा-या भाजीमध्ये नैसर्गिक जिवणसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा माळा, पुननवर्वा, कडू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकनेरी, भोवरी या सारख्या भाज्यामध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅलशियम यांचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे. भारंगीची भाजी ही नविन फुटलेल्या कोंबाच्या व पानाच्या स्वरुपात असते. यात प्रोटीन्सही भरपूर असतात टाकळयाची भाजी ही मेथीच्या भाजीसारखी असते. टाकळयाची पानाचा लेप विविध त्वचा विकारावर लावतात. या भाजीला ‘तखटा’ असे ही म्हणतात.

या भाज्यात करटोली

बाफळी,  हेळू,   कडमडवेली,  

आघाडा,  गुळवेल,   नळीची भाजी,  मायाळू, सुरन कंद,  

केणा,अळू,   शेवगा  आदी रानभाज्या विविध रोगावर गुणकारी ठरल्या आहेत.

तसेच रानभाज्यत्याचे आहारामध्ये सेवन करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते

दरम्यान, जिल्ह्यात  शासनाचे निर्देशानुसार तालुकास्तरावर ता.९ रोजी  रानभाजी महोत्सव’  आयोजीत करण्याचे नियोजन कृषि विभागाने केले असल्याचे श्री शहारे यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com