

Leopard Attack
sakal
जिंतूर - तालुक्यातील खोलगाडगा शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालून एका गाईच्या वासराला फस्त केल्याची घटना शनिवारी (ता.३१) पहाटे पाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रब्बी हंगामातील पेरणी आणि शेतीच्या कामासाठी शेतात कसे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.