

Leopard Attack
esakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - तालुक्यातील जुने नेवरगाव येथे बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कैलास संपत डवले (वय-४६) हे जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर हल्ल्यामुळे पंजांचे ओरखडे पडले आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.