
कांडली शिवारात आता पर्यंत तीन वेळेस बिबट्या दिसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कांडली, भोसी शिवारात बिबट्या दिसल्याचे शेतकरी सांगत आहेत. कांडली शिवारात आतापर्यंत तीन वेळेस बिबट्या दिसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. या प्रकाराने गावकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने ट्ँप कँमरे बसवून या भागात तळ ठोकला आहे.
कांडली येथील शेतकरी शिवम बाळासाहेब पतंगे हे आपल्या शेत आखाड्यावरुन शेतातील तुरपिकात मंगळवारी (ता. १२) रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना दहा वाजताच्या सुमारास तुर पिकाच्या बाजुने डरकाळी फोडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा ते एकटे असल्याने घाबरले त्यांनी शेजारील सालगडी निळकंठ कांबळे व शेतकरी नितीन अवचार व अन्य एकास शिळ वाजवून जागी केले. त्यानंतर हे तिघे एकत्र होऊन आरडाओरडा करून डरकाळी फोडणाऱ्या प्राण्याला हुसकावून लावले तो प्राणी तेथून निघून गेला असल्याचे लक्षात आल्यानंतर तो प्राणी ज्या ठिकाणी वावरला त्या ठिकाणी जाऊन टार्चने पाहणी केली तर शेतजमिनीवर प्राण्याच्या पायाचे ठसे दिसुन आले व बाजुला रक्त पडलेले दिसुन आल्या चे या शेतकऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - नांदेड - गुरुवारी कोरोना प्रतिबंधक ‘लसी’चे १७ हजार डोस उपलब्ध होणार
लगेच त्यांनी वारंगा येथील वनपाल कर्मचारी यांना मोबाईलवर कळवले की, आमच्या शेतात कोणतातरी प्राणी दिसला असल्याचे सांगितले लगेच मंगळवारी रात्री वनपाल कर्मचारी ए. ए. शिखरे, संतोष कचरे, श्रीमती फड, श्री. चव्हाण तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल पतंगे हे आपल्या सहकाऱ्या सोबत घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी शेतशिवारात जाऊन बिबट्या वावरला त्याठिकाणी जाऊन पाऊलखुणाची पाहणी केली व जमिनीवर सांडलेल्या रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आले.
नंतर लगेच गावकरी राहुल पतंगे यांनी वनपरिमंडळ अधिकारी प्रिया साळवे यांना मोबाईलवर संपर्क साधून कांडली शेतशिवारात बिबट्या आढळुन आल्याचे सांगितले वनपरिमंडळ अधिकारी साळवे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाऊलखुणाची व रक्त नमुने घेऊन बिबट्या वावरला तो परिसर गावकऱ्यांच्या मदतीने सिल करण्याचे घोषित केले शिवाय जवळपासच्या ३० शेतकऱ्यांना सावधगिरी वाळगण्याच्या सुचना केल्या. शिवाय शेत आखाड्यावर अंधारात असलेले पाळीव प्राणी गाई, म्हैस, बैल आदी पाळीव प्राणी उजेडात बांधण्याचे सांगितले शिवाय वनपरिमंडळ अधिकारी वनपाल, कांडली व भोसी येथील शेतकऱ्यांच्या मदतीने शेतशिवारात ट्ँप कँमेरे बसविण्यात आले शिवाय मंगळवारी रात्री पहाटेपर्यंत व बुधवार दिवसभर वनपरिमंडळ अधिकारी प्रिया साळवे, श्रीमती फड, ए. ए.शिखरे, संतोष बोचरे श्री. चव्हाण, शेतकरी शिवम पतंगे, नितीन अवचार, राहुल पतंगेसह आदी शेतकरी व गावकऱ्यांनी दिवसरात्र कडक पहारा रक्षण केले शिवाय वनपरिमंडळ अधिकारी प्रिया साळवे यांनी गावकऱ्यांना सुचना केल्या शेतात जाताना एकटे जाऊ नका सहकाऱ्यांना सोबत घेऊन जा कोणता प्राणी दिसल्यास सर्वांनी मिळुन हुसकावून लावा.असे सांगितले. दरम्यान डिसेंबर महिन्यात या भागात ता. २८ व त्यानंतर शेवाळा येथे ता. ३० बिबट्याचे दर्शन झाले होते तर परत एकदा कांडली शिवारात एका श्वानावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे गावकरी सांगत आहेत.
शेतात आढळलेल्या पाऊलखुणाची तपासणी करून बिबट्याचा होत्याच का ते लवकरच तपासणी अंती समजेलच.मात्र शेतकऱ्यांना काळजी घेणे गरजेचे आहे. एकट्याने शेतशिवारात जाऊ नये.
- प्रिया साळवे, वनपरिमंडळ अधिकारी
संपादन- प्रल्हाद कांबळे
|