कोरोना विरुद्ध एकजुटीने लढू या.....कोण म्हणाले ते वाचा

कृष्णा जोमेगावकर
सोमवार, 6 एप्रिल 2020

सध्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण अद्यापही सापडलेला नाही. त्यामुळे नांदेड शहरात तेवढे भीतीचे वातावरण पण सावधान रहावे

नांदेड : देशासह राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्याच्या मुख्यमत्र्यांसह उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह आरोग्य व पोलिस विभागाचे अधिकारी - कर्मचारी दिवसरात्र मेहणत घेत आहेत. त्यांना साथ देवून कोरोना विरुद्ध एकजुटीने लडू असा निर्धान चौफाळा भागातील तरुणांनी केला आहे.
 

रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
सध्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण अद्यापही सापडलेला नाही. त्यामुळे नांदेड शहरात तेवढे भीतीचे वातावरण पण सावधान रहावे. व त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये हे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची मोठी संख्या आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस नांदेड शहरात प्रवेश देतांना त्यांची तपासणी करावी. यानंतरच त्यांना गल्लीमध्ये प्रवेश द्यावा, असा ठाम निर्णय चौफळा भागातील गजानन पाटील हरकरे यांनी घेतला आहे. 

तरुणांनी घेतली खबरदारी
चौफाळा सर्व समाज असणारा परिसर आहे. या परिसरामध्ये प्रत्येक गल्लीबोळात अनेक गल्लीतील नव युवकांनी आपल्या गल्लीतला सर्व रस्ते बंद केले आहेत. बाहेरील कोणताही व्यक्ती आत येणार नाही, याची दक्षता गजानन पाटील हरकरे यांनी घेतली आहे. या साठी त्यांनी देखील चौफाळा भागामध्ये अनेक ठिकाणी बांबु लावून रस्ते बंद केले आहेत. तरुणांच्या खबरदारीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा....

महानगरातुन आलेल्यांची काळजी घ्यावी
कोरोनापासून महाराष्ट्र कसा मुक्त होईल यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स हे सर्वजण या कोरोना रोगापासून मुक्त राहण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या आवाहनाला साथ देण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी व नांदेड शहरातील प्रत्येक नगरसेवकाने देखील आपल्या गल्लीमध्ये व परिसरात पुणे-मुंबई व औरंगाबाद येथून येणाऱ्या नागरिकांनी थेट प्रवेश नकरता त्यांची शासकीय रुग्णालयात तपासणी झाल्यानंतरच त्यांना आपल्या गल्लीमध्ये प्रवेश द्यावा असे गजानन पाटील हरकरे यांनी सांगितले. 

हेही वाचलेच पाहिजे.....

अनेक नागरिक उपस्थित

या वेळी राजू हरकरे, शंकर भालेराव, राजू जाधव, राजेश्वर पांचाळ, बाळू पाटील, बजरंग हरकरे, दीपक कदम, बालाजी पतंगे, शंकर सोमासे, सचिन शिंदे, श्याम कदम, राजू हरकरे, गणेश सूर्यवंशी, नागोराव वडजे. ज्ञानेश्वर पवार. राम कराळे, बालाजी कुराडे, संजू तिडके, कृष्णा तिडके यांच्यासह चौफळा भागातील अनेक नागरिक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's fight unitedly against Corona ..... read who said, nanded news