
छत्रपती संभाजीनगर : कोकण, पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भात जोर धरलेल्या पावसाचा मराठवाड्यावरील रुसवा कायम असल्याचे चित्र आहे. आठ जिल्ह्यांपैकी काही भागांत केवळ ढगाळ वातावरण आणि रिमझिमच्या पलिकडे तो सरकताना दिसत नाही. अर्थात रिमझिमने पेरलेल्या क्षेत्राला टवटवी आणि राहिलेल्या पेरणीला वेग आला आहे.