Lightning Strike : वीज कोसळून पाच जनावरे दगावली, पालिकेसमोरील झाड कोसळून १२ दुचाकींचे नुकसान
Cattle Death : उमरगा शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे वीज पडून पाच जनावरे दगावली, झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाले आणि शेतीसह घरांनाही हानी पोहोचली.
उमरगा : उमरगा शहरासह तालुक्यात मंगळवारी (ता.१३) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, चार ठिकाणी वीज कोसळून पाच जनावरे दगावली.