Beed News : वीज पडल्याने आठवड्यात चौघांचा मृत्यू; १० वर्षांत ८७ जणांनी प्राण गमावले, जिल्ह्यात एकही विजरोधक यंत्र नाही
Maharashtra Weather : बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला असून, गेल्या दहा वर्षांत ८७ जणांचा जीव गेला आहे. तरीही जिल्ह्यात एकाही ठिकाणी वीजरोधक यंत्र नाही, ही बाब चिंतेची आहे.
बीड : नैसर्गीक आपत्तीला रोखणे कठीण असले तरी काही उपाय योजनांच्या माध्यमातून आपत्तीचा प्रकोप कमी करता येतो. तसेच आकाशातून कोसळणाऱ्या वीजेला प्रतिबंधासाठी वीजरोधक यंत्रणा काम करते.