

Beed News
esakal
बीड: वीज म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणारा प्रचंड भाराचा विद्युत प्रवाह होय. वादळी ढगांमध्ये असणाऱ्या बर्फाच्या कणांवर वर जाणारी हवा आणि खाली जाणारे गुरुत्वाकर्षण यांचा परिणाम होऊन ढगांच्या वर आणि खालच्या थरात धनभार आणि आणि ऋणभार तयार होतो. या भिन्न भारामुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत उत्सर्जन निर्माण होऊन काही वेळाने हवेतील विद्युत प्रतिकार क्षमता खंडित होऊन विजा चमकतात.
उच्च दाबाची वीज ज्या वेळी उत्सर्जित होते, तेव्हा विद्युत मार्गातील उष्णता एकाएकी वाढत असल्यामुळे विद्युत मार्गातील हवेचा दाबही तीव्रतेने वाढतो व त्यामुळे विद्युत गर्जना निर्माण होते. मोठी वीज गर्जना किंवा अचानक येणारा प्रचंड प्रकाश यामुळे बहिरेपणा किंवा आंधळेपणा येऊ शकतो. अचानक झालेल्या आघातामुळे व्यक्ती गोंधळून जाऊन दीर्घकालीन मानसिक धक्का पोचू शकतो.