

Infant Body Found Buried on Gairan Land
Sakal
लिंबेजळगाव : गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील गट क्रमांक 177 टेंभापुरी रस्त्यालगत असलेल्या गायरान जमिनीत अंदाजे एक ते दीड महिने वयाच्या अर्भकाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (ता. १४) उघडकीस आली असून सोमवारी (ता. १५) वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खड्ड्यांचे उत्खनन केल्यानंतर मृत अर्भक आढळून आले.