‘Limboti Dam Wate: लिंबोटी’त ३५ टक्के साठा, दोन दिवसांआडचा पुरवठा ४ दिवसांवर येणार; कंधार शहराला तीन महिनेच पुरणार पाणी!

Limboti Dam Water Storage, Kandhar Water Supply, Drought अंतर्गत लिंबोटी धरणात सध्या ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून कंधार शहराला सुमारे तीन महिनेच पाणीपुरवठा होणार आहे. सध्या दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा भविष्यात चार दिवसांआड करण्याची शक्यता आहे.
Limboti Dam in Kandhar has 35 percent water storage amid rainfall shortage

Limboti Dam in Kandhar has 35 percent water storage amid rainfall shortage

esakal

Updated on: 

नांदेड, ; पावसाने यंदा सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्याने कंधार तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक बनली आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या लिंबोटी धरणात सध्या केवळ ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यावर शहराची तीन महिनेच तहान भागेल, अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी संदिप भोळे यांनी दिली. शिवाय सध्या होणार दोन दिवसांआडचा पुरवठा भविष्यात चार दिवसांआड केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कंधार शहराला लिंबोटी धरणावरून करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाण्याची आवक अपेक्षेप्रमाणे झाली नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे ८३७ मिलिमीटर असताना यंदा आतापर्यंत साडेपाचशे मिलिमीटरच्यावर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची तूट कायम असून, उपलब्ध जलसाठ्यावर त्याचा थेट परिणाम होण्याचे चिन्हे आहेत. मध्यम, लघु प्रकल्प तळाला तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांसह गाव तलावांमध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. अनेक जलसाठे तळाला गेले असून, आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे

. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांसमोर खर्चाचे आव्हान यंदा पावसाने दडी मारल्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. उत्पादनाचे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर कर्जफेड, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. उपाययोजनांची प्रतीक्षा कंधारचा दुष्काळाच्या यादीत समावेश झाल्यानंतर शासनाकडून उपाययोजना सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. मात्र, प्रत्यक्षात या उपाययोजनांची प्रतीक्षा कायम आहे. पाण्याचे नियोजन, टँकरची संभाव्य व्यवस्था, चारा छावण्या, पशुधनासाठी पाण्याची सोय आणि शेतीच्या नुकसानीबाबत उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.

आरक्षित साठ्यामधून सिंचन केल्यास कारवाई

नांदेड, ता. २ : पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी उपसा करू नये, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) यांनी परवानाधारक शेतकऱ्यांना केले आहे. अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यासह पंप, इंजिन, केबल आदी साहित्य जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा विभागाने दिला आहे. नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) अंतर्गत शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील अन्तेश्वर उच्च पातळी बंधारा, विष्णुपुरी उच्च पातळी बंधारा तसेच रेणापूर सुधा लघु प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

या पाणीसाठ्याचा नियोजनानुसार पिण्यासाठी वापर होण्यासाठी तसेच अधिकृत अथवा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित जलाशयांवरील परवानाधारक शेतकऱ्यांनी मोटारपंप, इंजिन, टँकर अथवा अन्य साधनांद्वारे पाणी उपसा करून सिंचन करू नये. तसेच सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात कोणत्याही पिकांची लागवड करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जलाशय परिसरात असलेले मोटारपंप, इंजिन, टँकर, स्टार्टर, केबल, सर्व्हिस वायर तसेच इतर साहित्य संबंधितांनी स्वतःहून तातडीने काढावे, असेही विभागाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com