esakal | घटस्थापनेपासून तुळजाभवानी मंदीरात मर्यादित प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

घटस्थापनेपासून तुळजाभवानी मंदीरात मर्यादित प्रवेश

घटस्थापनेपासून तुळजाभवानी मंदीरात मर्यादित प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजा भवानी मंदीरात घटस्थापनेपासून दररोज 15 हजार भाविकांनाच मंदीरात प्रवेश देण्यात येणार आहे असा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगांवकर यांनी काढले आहेत.

तुळजाभवानी मातेचे नवरात्र येत्या ता.7 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हा प्रशासनाने भाविकांसाठी मंदीर खुले केले असून प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मंदिरात ब्रेक द चेन या सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. मंदीरात भाविक भक्तांना दश॔नासाठी प्रवेश देण्यात येईल. भाविकांचे अभिषेक, धार्मिक विधी करता येणार नाहीत. महंत ,मानकरी, पुजारी यांच्यासह झालेल्या बैठकीनुसार नवरात्र उत्सव काळात सर्व विधी व कुलाचार त्या त्या मानकरी, महंत, सेवेधारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहेत.

तुळजा भवानी मातेच्या मंदीरात भाविकांना पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याबाहेरील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करताना ज्या नागरीकांचे कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरीकांना बाहेरच्या राज्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. दरम्यान तहसीलदार तथा तुळजा भवानी मंदीर समिती चे विश्वस्त सौदागर तांदळे यांनी या माहितीस रात्री दुजोरा दिला.

यात्रेबाबतचे ठळक मुद्दे

मास्कचा वापर, हाताची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील. सर्व हाॅटेल, कार्यालये, माॅल यांच्या आस्थापनेवर असलेल्या कम॔चार्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लशीच्या दोन मात्रा होऊन 14 दिवस झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी भाविकांना प्रवेश नसणार

18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोजागिरी पौर्णिमा होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी मानकरी, पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व धार्मिक विधी परंपरेने पार पडणार आहेत. तुळजापूर शहरातील नागरिकांशिवाय इतरांना शहरात प्रवेश देण्यात येणार नाही. कोजागिरी पौर्णिमा यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाबंदीचा स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.

loading image
go to top