Beed Crime : कंत्राटदाराचा कहर! वडील भावासह कार्यालयात घुसून लाईनमनला बेदम मारहाण पाटोदा येथील घटना
Mahavitaran : पाटोदा येथील महावितरण कार्यालयात लाईनमनवर कंत्राटदार व कुटुंबीयांनी दोनदा मारहाण केली. या घटनेनंतर कर्मचारी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन करत आरोपींवर कारवाईची मागणी केली.
पाटोदा : येथील महावितरण कार्यालयात लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास कंत्राटदार राहील सलीम शेख याने आपल्या वडील, भावासह थेट कार्यालयात घुसून सोमवारी (ता. २३) जबर मारहाण केली.