जेवळी (ता. लोहारा) - येथे लिंगायत स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस असून दिवसेंदिवस येथील स्मशानभमीच्या प्रश्नासाठी संघर्ष तीव्र होत आहे. गुरुवारी (ता. ७) या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी येथील नागरिकांनी राजमार्गावर जेवळी येथे रस्ता रोको आंदोलन करुन तहसीलदारास निवेदन देण्यात आले.