LLB-CET Exam Update : एलएलबी सीईटी परीक्षा २ आणि ३ मे रोजी

Maharashtra Education : नीट यूजी परीक्षेमुळे परीक्षा केंद्रे उपलब्ध न झाल्याने एलएलबी तीन वर्षांच्या सीईटी परीक्षा आता २ आणि ३ मे रोजी घेण्यात येणार आहेत.
LLB-CET Exam Update
LLB-CET Exam Update Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाची ८७ हजार ९३७ विद्यार्थ्यांची सीईटी ३ आणि ४ मे रोजी नियोजित होती. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ४ मे रोजीच्या नीट यूजी परीक्षा घेण्यासाठी केंद्रांची निश्‍चिती केली. त्यातील काही परीक्षा केंद्रे सीईटी सेलने एलएलबी सीईटीसाठी आरक्षित केली होती. त्यामुळे ती परीक्षा केंद्रे नीट परीक्षेमुळे वापरता येणार नसल्याने एलएलबी सीईटी २ आणि ३ मे रोजी घेण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com