लॉकडाऊन : नंदुरबारहुन आलेल्या ‘त्या’ महिलेला मिळाले जिवदान

शिवचरण वावळे
Friday, 10 April 2020

एक २६ वर्षीय महिला रुग्ण कावीळ झाल्यामुळे अत्यवस्थ होऊन कारने सहाशे किलोमिटर पेक्षा अधिक लांबचा प्रवास करत नांदेडला आली. पोटिकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी वेळ न दवडता त्या महिलेची ई.आर.सी.पी. ही एन्डोस्कोपीद्वारे शत्रक्रिया केली व सहा वर्षापूर्वी तिच्या पोटात बसविण्यात आलेली प्लास्टीकची नळी बाहेर काढली. 

नांदेड : कोरोनाच्या भितीने खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णास न तपासताच डॉक्टर गोळ्या व औषध लिहून देत असल्याचे प्रकार घडलेत. घडत आहेत. मात्र, नांदेड शहरातील अनेक मोठी रुग्णालये ‘कोरोना’च्या नियमांचे पालन करत रुग्णांना अत्यावश्यक सेवा सुविधा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी शेकडो किलोमिटरहून अत्यावस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २६ वर्षीय काविळग्रस्त महिलेला नांदेडच्या रुग्णालयात जिवदान मिळाले आहे. 

बुधवारी (ता. आठ एप्रिल २०२०) ला नंदुरबार जिल्ह्यातुन एक २६ वर्षीय महिला रुग्ण कावीळ झाल्यामुळे अत्यवस्थ होऊन कारने सहाशे किलोमिटर पेक्षा अधिक लांबचा प्रवास करत नांदेडला आली. या महिलेची सन २०१४ मध्ये हैदराबादच्या एका रुग्णालयात पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान तिच्या पित्ताशयात एक प्लास्टिकची नळी टाकुन तात्पुरत्या स्वरुपात पित्तवहन सुरळीत करण्यात आले होते. परंतु ही नळी बाहेर काढण्याचे लक्षात न आल्याने त्याभोवती नवीन खडे तयार होऊन कावीळ आजार बळावला व त्यात जंतुसंसर्ग झाला. परिणामी महिलेस थंडी वाजून ताप येण्यास सुरुवात झाली व पोटात असाह्य वेदना होत्या. 

हेही वाचा- Video : नांदेडकरांच्या आरोग्यासाठी पोलिसांची कसरत
पोटातुन प्लास्टीकची नळी बाहेर काढली

तेव्हा त्यांना तीन वर्षापूर्वी नांदेडात तपासणी झालेले गॅलेक्सी हॉस्पीटलची आठवण झाली. रुग्णालयाची जुनी फाईल उचलुन दोघे नवराबायकोनी थेट नांदेड गाठले. महिलेला बोरबन स्थित ‘गॅलक्सी’ पचनसंस्था आणि यकृतविकार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटिकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी वेळ न दवडता त्या महिलेची ई.आर.सी.पी. ही एन्डोस्कोपीद्वारे शत्रक्रिया केली व सहा वर्षापूर्वी तिच्या पोटात बसविण्यात आलेली प्लास्टीकची नळी बाहेर काढली. यासाठी त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम कलंत्री आणि फीजीशियन डॉ. गजानन रातोळीकर यांच्या चमूची साथ मिळाली. अत्यावस्थेत दाखल झालेली ही महिला यशस्विरित्या उपचार घेऊन सायंकाळी घरी परतली.  

हेही वाचा-  वर्तमानपत्रामुळेच रुंदावतात ज्ञानाच्या कक्षा

कोरोनाची योग्य खबरदारी घेऊन रुग्णसेवा 
मागील १८ दिवसांपासून विविध माध्यमातुन फक्त कोरोना या एकाच आजाराची महिती दिली जात आहे. कोरोना आजाराबद्दल सर्वती खबरदारी घेत आम्ही रोज सकाळी तीन तासांत १५ आणि सायंकाळी १० म्हणजेच एका तासात पाच रुग्णांची तपासणी करतो. तसेच पोटाचा विकार झालेल्या रुग्णांवरही  इमर्जन्सी एन्डोस्कोपी करत आहोत. प्रत्येक डॉक्टरने स्वतःची काळजी घेऊन रुग्णांची तपासणी करायला पाहिजे.  
-डॉ. नितीन जोशी, संचालक (गॅलक्सी रुग्णालय)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: The Woman Who Came From Nandurbar Got Her Life Nanded News