

Loha Savargaon-Bardapur Road
esakal
परळी वैजनाथ : परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील बीड व लातूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-ब वरील लोखंडी सावरगाव ते लातूर रोडवरील बर्दापूर फाटा या दोनपदरी रस्त्याचे आता चौपदरीकरण होणार आहे. या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून, सुमारे १७.५० किलोमीटर लांबीच्या या कामासाठी १०४.४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे.