Lohara LPG Shortage: लोहाऱ्यात व्यावसायिक गॅस टंचाई; हॉटेल आणि चहा टपरी व्यवसाय संकटात

Commercial LPG Cylinder Shortage Affects Lohara Businesses: लोहारा तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हॉटेल, ढाबे आणि चहा टपरी व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. अनेकांकडे फक्त दोन दिवसांचा गॅस शिल्लक असून काही ठिकाणी सिलिंडर वाढीव दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
Lohara LPG Shortage

Lohara LPG Shortage

esakal

Updated on

लोहारा : सिलिंडरच्या टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल, ढाबे व चहा टपरी व्यावसायिकांना बसला आहे. शहर व तालुक्यात सुमारे अडीच ते तीनशेपर्यंत छोटे-मोठे हॉटेल व चहा टपऱ्या आहेत. सिलिंडरअभावी त्यांच्यावर व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

तर, अनेक हॉटेल आणि रेस्टाॅरंटधारकांकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे कामगारांवरसुद्धा गॅस सिलिंडरने संक्रात आणली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com