

Success Story
sakal
लोहारा (जि. धाराशिव) : कष्ट, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर दारिद्र्यावर मात करत यशाच्या शिखरावर पोचता येते, याचा वस्तुपाठ शहरातील शहाबुद्दीन शेख यांनी घालून दिला आहे. हमालीच्या कामातून संसार चालवत असताना मुलांचे भवितव्य शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल व्हावे, असे स्वप्न त्यांनी बाळगले होते.