

Dharashiv News
esakal
लोहारा: शहरासह तालुक्यात मंगळवारी (ता. १९) झालेल्या भीषण गारपिटीने आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर गुरुवारी (ता. १९) पुन्हा पावसाने मीठ चोळल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळाले. गारपिटीमुळे पिके जमीनदोस्त झाली असतानाच पुन्हा झालेल्या पावसामुळे उरल्यासुरल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.