esakal | लोहारा: मानधनासाठी किर्तनकार, कलावंताचा आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

lohara

लोहारा: मानधनासाठी किर्तनकार, कलावंताचा आंदोलन

sakal_logo
By
निळकंठ कांबळे

लोहारा (जि.उस्मानाबाद): किर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या किर्तनकार, कलावंतांना राज्य सरकारने मानधन देण्याची जाहीर करून वर्ष उलटले तरी अद्याप मानधन दिले नाही. त्यामुळे मानधन त्वरीत द्यावे, या मागणीसाठी लोहारा तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता.तीन) तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: Aurangabad:परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मागील दीड वर्षापासून सामूहिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. किर्तन, नाटक, अखंड हरीनाम सप्ताह, पारायण सोहळे पूर्णत: बंद आहेत. बहुतांश किर्तनकार, लोककलांवतांचा उदर्निवाह यावरच चालतो. परंतु धार्मिक व इतर कार्यक्रम घेण्यास मनाई केल्यामुळे गायक, वादक, हार्मोनियम वादक, टाळकरी, विणेकरी यासह नाट्य कलावंतांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंतांना दर महिन्याला मान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जवळपास एक वर्षाचा कालखंड उलटला तरी अद्याप मानधन दिले नाही. त्यामुळे मानधन तत्वरीत द्यावे, या मागणीसाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात महिला कलावंतांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: परळीत वैद्यनाथ अर्बन बँकचा अधिकारी ताब्यात

यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार, सिंधुताई बडोरे, जयश्री कुलकर्णी, भारताबाई फुरडे, सरस्वती यादव, जिजाबाई कांबळे, अनिता फुरडे, सुनीता घोटाळे, गोकर्णा बिराजदार, सचिन दासीमे, भगवान गरड, सतीश माळी, हरी वाघे, मधुकर भरारे, सदाशिव बिराजदार, शिवाजी बिराजदार, भास्कर मोरे, रवी कोळी, शिवाजी मोरे, तुकाराम काडगावे यांच्यासह बहुसंख्य कलावंत उपस्थित होते.

loading image
go to top