
लोहारा : शहरातील मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रसिद्ध माऊली ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात मंगळवारी (ता.१५) पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाली. चार अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून सुमारे ४० हजार रोख रकमेससह सहा लाख ४० हजार रूपयांचे चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.