

Police Raid on Illegal Gambling Den in Lohgaon
esakal
नायगाव : रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव शिवारात खैरगाव रोडलगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (ता. नऊ) पहाटेच्या सुमारास रामतीर्थ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले, तर सात जुगारी पळून जाण्यात यशस्वी ठरले.