जमिनीतून मोठा आवाज आला अन् गावकरी हादरले... 

bhukapm
bhukapm
Updated on

हिंगोली ः वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे मंगळवारी (ता.२३) सायंकाळी ५.२९ वाजता जमिनीतून मोठा आवाज आला. या आवाजाने घरात असलेले गावकरी बाहेर निघाले. या आवाजाने गावात कोणतीही हाणी झाली नाही. मात्र, गावकरी भयभित झाले आहेत. वसमतसह कळमनुरी तालुक्‍यातील काही गावातदेखील हा आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत. 

वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे मागच्या अनेक वर्षांपासून जमिनीतुन गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत ८० वेळेस असे आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत. मागच्या काही वर्षांपुर्वी हे आवाज वर्ष सहा महिण्याला येत असत. मात्र, मागच्या चार ते पाच वर्षांपासून हे आवाज आता कधी पंधरा दिवसानंतर तर कधी आठ दिवसाला देखील हे आवाज होत आहे. यापुर्वी दोन वेळेस येथे सौम्‍य भुकंप झाल्याची नोंददेखील लातूर येथील भुमापक यंत्रावर झाली आहे. 

आवाजाची भीती गावकऱ्यांच्या मनात 
पांगरा शिंदे येथे येणारे हे आवाज कशाचे येत आहेत याचे मात्र गुढ अद्यापही उकललेले नाही. गावकऱ्यांनी जिल्‍हा प्रशासनाकडे याबाबत अनेक वेळेस माहिती दिली. आता हे आवाज नित्याचेच झाल्याचे गावकरी सांगत आहेत. कधी रात्री बेरात्री देखील हे आवाज येत असल्याने गावकऱ्यांची झोप आवाजाने उडविली आहे. एक वेळेस येथे स्‍वारातीम विद्यापीठातील तज्ज्ञांनी देखील भेट देवून पाहणी केली. मात्र त्‍याचे पुढे काहीच झाले नाही. यामुळे गावात या आवाजाची भीती गावकऱ्यांच्या मनात आहे. 

गावकरी जमले रस्त्यावर 
मंगळवारी सायंकाळी ५.२९ वाजता जमिनीतुन मोठा आवाज आल्याने गावकरी रस्‍त्‍यावर जमा झाले होते. गावात कोठे काही झाले का याची माहिती फोनवर घेत होते. मात्र, या आवाजाने कोणतीही हाणी झाली नाही. हा आवाज पांगरा शिंदेसह वापटी, कुपटी, खापरखेडा, खांबाळा. सिरळी या गावातदेखील आल्याचे गावकरी सांगत आहेत. तर कळमनुरी तालुक्‍यातील बोल्‍डा, येहळेगाव गवळी, पोतरा, सिंदगी या गावातदेखील हा आवाज आला. पांगरा शिंदे येथे आवाज आल्यावर वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील या गावातदेखील आवाज येत आहे. 

तीन महिण्यापुर्वीही बसला होता धक्का 
मागच्या तीन महिण्यापुर्वी वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील या गावात भुकंपाचा सौम्य धक्‍का बसला होता. त्‍याची ३.४ रिश्टरस्‍केलवर नोंददेखील झाली होती. त्‍यांनतर कळमनुरी तालुक्यातील पोतरा व सिंदगी गावात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली होती. दरम्‍यान, पोतरा गावात हे अधिकारी, कर्मचारी असताना त्‍यांच्या समोरच जमिनीतून आवाज आला होता. सतत या गावात होत असलेल्या या आवाजाचे गुढ उकलावे, अशी मागणी या गावातील गावकऱ्यांतून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ambad Civic Body Removes Illegal Roadside Encroachments to Ease Traffic Congestion
MLC Basavaraj Patil Says He Earned Friends Across Politics, Promises Welfare for All
Gangapur Academic Achievement: Sunil Vaysal Awarded PhD in Commerce
Siddharth Nirpal secured second rank in Gangapur taluka, while Shravani Vaysal earned a place in the Chhatrapati Sambhajinagar district merit list.
Marathi News Esakal
www.esakal.com