priti kanavate and dinesh jadhav
sakal
चाकूर, (जि. लातूर) - आनंद, स्वप्ने आणि भविष्याच्या अपेक्षांनी भरलेल्या मनाने होणाऱ्या नवऱ्याला भेटण्यासाठी निघालेल्या प्रीती कानवटे (रा. तळेगाव, ता. अहमदपूर) यांचा एसटी बसच्या भीषण अपघातात उजवा हात कायमचा निकामी झाला.
अशा प्रसंगी अनेक नाती तुटताना दिसतात; मात्र, दिनेश जाधव यांनी प्रीतीची भक्कम साथ निभावली. संकटाच्या काळात पाठीशी उभे राहत त्यांनी तिच्याशी रेशीमगाठ बांधून प्रेम, विश्वास व माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला.