प्रेमी युगुलास आठ तासात पकडले

file photo
file photo

मुखेड : शहरातील एक महाविद्यालयीन राजस्थान येथील युवकासाेबत पळून जात असल्याची तक्रार मुखेड पाेलिसांना प्राप्त हाेताच फाैजदार गणपत चित्ते यांनी तातडीने सुत्र हलवत अवघ्या आठ तासात दाेघांनाही ताब्यात घेऊन पालकांच्या हवाली करण्यात आले. याबाबत पाेलिसांच्या तत्परतेचे काैतूक केले जात आहे.

शहरातील महाविद्यालयात शिकत असलेल्या एक सज्ञान मुलगी व शहरातच फरशीच्या फिटींगचे काम करणारा 26 वर्षीय दिपक या दाेघांचे मागील दीड वर्षापासून प्रेमप्रकरण चालु हाेते. दरम्यान बुधवारी (ता.27) सकाळी 10च्या सुमारास मुलगी काॅलेजला जात असल्याचे सांगुन घराबाहेर पडली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी न पाेचल्याने चिंताग्रस्त झालेल्या पालकांनी रात्री आठ वाजता पाेलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली.

घटनेचे गांभीर्य आेळखून पाेलिस निरीक्षक एन.जी.आकुसकर व फाैजदार गणपत चित्ते यांनी नांदेड येथे माहिती देऊन माेबाईल लाेकेशन तपासणी केले असता नांदेड हून नागपुरकडे जात असल्याचे दिसून आले. संबंधित ट्रॅव्हल्स चालकाशी चाैकशी केल्यानंतर  पाेलिस शिपाई महिंद्रकर व गृहरक्षक दलाचे  अल्ताफ शेख यांनी खाजगी गाडीतून पाठलाग करत अकाेला जिल्ह्यातील पातूर पाेलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत दाेघांनाही ताब्यात घेण्यात आले. घटना दाखल करून आठ तास उलटण्याच्या अगाेदरच पाेलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आमची मुलगी परत येऊ शकली अशी प्रतिक्रीया मुलींच्या पालकांनी दिली. तर पाेलिसांच्या या कामगिरीचे काैतूक केले जात आहे.

पालकांनी पाल्यावर लक्ष ठेवावे-  पाेनि आकुसकर

शालेय जीवनानंतर महाविद्यालयीन जीवन हे माेठे कसरतीचे असते स्वैरविचारसरणी व बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटत असल्याने मुला-मुलींमध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण हाेत असते. पालकांनी या दरम्यान आपल्या मुलांच्या व मुलींच्या दरराेजच्या वागण्यात , बाेलण्यात हाेत असलेले बदल पाहून त्यांच्यावर अंकुश ठेवल्यास अशा प्रकारांना आळा बसताे यासाठी प्रत्येक पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com