esakal | लोअर दूधना धरणाचे सोळा दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

lower dudhna dam

लोअर दूधनाचे सोळा दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (परभणी): तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण ९८.३४ टक्के भरले आहे. बुधवारी (ता.०८) रोजी धरणाचे सोळा दरवाजे ०.६० मिटरने उचलले असून दुधना नदीपात्रात ३६ हजार ७४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण सुत्रांच्या वतीने नदी काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण ९८.३४ टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता बुधवारी प्रकल्पाचे द्वार क्र. ०१ व २० हे दोन दरवाजे ०.९० मीटरने आणि द्वार क्र. २, ३, ४, ५, ६, ७, ८, १३, १४, १५, १६, १७, १८, व १९ हे चौदा दरवाजे ०.६० मीटरने सुरू असून नदीपात्रात एकूण ३२५०x२ + २१६०x१४ = ३६ हजार ७४० क्यूसेक्स विसर्ग दूधना नदी पात्रात दूपारी बाराच्या सुमारास सोडण्यात आला आहे.

दरम्यान मागच्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन देखील झाले नाही. मंगळवारी ( ता.०७ ) रोजी भल्यापहाटे पासून जोराचा पाऊस सुरू होता. लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे धरण सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: करूणा धनंजय मुंडेंची 'एक प्रेम कथा' लिखाणापूर्वीच वादात!

वाहतूक ठप्प...

मंगळवारी लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरण ९८.३४ टक्के इतके भरल्याने बुधवारी धरणाची सोळा दरवाजे उघडून ३६,७४० क्युसेसने दूधना नदि पात्रात विसर्ग करण्यात येत आहे.त्यामुळे त्या मर्गावरिल सेलू—देवगाव (फाटा), राजवाडी—वालूर हे रस्ते वाहतूकीसाठी बंद झाली आहेत.

loading image
go to top