

Lower Dudhna Project in Parbhani district has less than 20 percent live water storage.
esakal
सेलू : यंदा अत्यल्प पावसामुळे केवळ १९. ८६ टक्के उरलेल्या जिवंत पाणीसाठ्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत आहे. अगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता जालना जिल्ह्याच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी निम्न दुधना प्रकल्पातील संपूर्ण साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकल्पातील बॅकवॉटर क्षेत्रातून शेती व पिकांसाठी होणारा बेकायदेशीर पाणी उपसा तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
. २६४ गावांसह सेलू शहराची तहान निम्न दुधना प्रकल्पावर अवलंबून आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू, जालन्यातील परतूर, मंठा ही शहरे आणि जवळपास ग्रामीण भागातील २६४ गावांची सोय या प्रकल्पावर अवलंबून आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी उपसाबंदीचे आदेश दिले असले, तरी पाटबंधारे, संबंधित विभागाकडे ३२ किलोमीटरच्या अथांग बॅकवॉटरवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि निधीचा तुटवडा आहे. त्यामुळे कागदावरील या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार आणि अनधिकृत उपसा कसा रोखला जाणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. योग्य नियोजनाची आवश्यकता २०२४ मध्ये निम्न दुधना प्रकल्प मृत साठ्यात गेला होता.
त्यावेळी सेलू, मानवत, परभणी तालुक्यातील गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने जलसंपदा विभागाने मृत साठ्यातून नदीपात्रात पाणी सोडले होते. त्या तुलनेत यंदा प्रकल्पात २० टक्क्यांपेक्षा कमी जिवंत साठा उपलब्ध आहे. योग्य नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीत तीनही तालुक्यांतील पिण्याचा प्रश्न सुटू शकतो. पातळी खालावल्याने चिंता... प्रकल्पाच्या जवळपास ३२ किलोमीटरच्या बॅकवॉटर क्षेत्रात जालना जिल्ह्यातील मंठा व परतूर तालुक्यातील ३० गावे येतात, जेथून ररोज सुमारे ०.२ दलघमी पाण्याचा शेतीसाठी उपसा केला जात होता. आता हा उपसा पूर्णपणे रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कडक उपाययोजना आखल्या जात आहेत. हे उपलब्ध पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवणे प्रशासनासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे.
निम्न दुधना प्रकल्पातील साठा २० टक्क्यांच्या खाली आला आहे.
४५ गावांवर टंचाईचे सावट निम्न दुधना प्रकल्पात समाधानकारक साठा असतो तेव्हा रब्बी हंगामासाठी कालव्याद्वारे ४ आवर्तने आणि उन्हाळी पिकांनाही पाणी सोडले जाते. यंदा पाऊसच नसल्याने पातळी चिंताजनक आहे. त्यामुळे यंदा शेतीसाठी आवर्तने मिळण्याची शक्यता धुसर असून उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे लागणार आहे. या प्रकल्पातील संकट काळात नदीपात्रातून पाणी सोडण्यात येणार नसल्याने परभणी, मानवत आणि सेलू तालुक्यातील नदीकाठच्या ४५ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.