

Rural LPG Crisis News
esakal
जवळगाव: एकीकडे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील घराघरांत गॅस पोहोचला होता. धूरमुक्त स्वयंपाकघरामुळे महिलांचे आरोग्य सुधारले होते आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
मात्र, सध्या गॅस सिलिंडरचा वाढता तुटवडा आणि आवाक्याबाहेर गेलेल्या किमतींमुळे ही परिस्थिती पुन्हा एकदा मागे फिरताना दिसत आहे. जवळगाव आणि परिसरातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने, नाईलाजाने महिलांना पुन्हा पारंपरिक चुली पेटवण्याची वेळ आली आहे.