
शिरूरकासार : ब्रह्मलीन संत निगमानंद महाराज यांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली मच्छिंद्रगडाची पंढरीची वारी पंचक्रोशीतील भाविकांसाठी पर्वणी ठरते. शिरूर कासारसह बीड आणि पाटोदा तालुक्यातील भाविकही या दिंडीत मजल दरमजल करत विठ्ठलनामाच्या गजरात तल्लीन होऊन पंढरी गाठतात.