
पिकातील आंतरमशागतीची कामे गतीने होण्यासाठी आधुनिक पंरतु सहजपणे उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून कृषी पदविकेचे शिक्षण घेतलेल्या प्रकाश घोडके यांनी स्वतःच्या संकल्पनेतून तुरीचे शेंडे खुडण्याचे यंत्र तयार केले आहे.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : पिकातील आंतरमशागतीची कामे गतीने होण्यासाठी आधुनिक पंरतु सहजपणे उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून कृषी पदविकेचे शिक्षण घेतलेल्या प्रकाश घोडके यांनी स्वतःच्या संकल्पनेतून तुरीचे शेंडे खुडण्याचे यंत्र तयार केले आहे. दरम्यान या यंत्राद्वारे एका मजुरामार्फत तीन ते चार एकर तुरीच्या क्षेत्रत शेंडे खुडण्याचे काम होते. यामुळे तुरीला मोठ्या प्रमाणात फुटवा होऊन उत्पन्नात १५ ते २० टक्के वाढ होते.
शेतीतील उत्पन्नवाढीसाठी आधुनिकतेचा वापर वाढला आहे. सेंद्रिय शेती कधीही लाखपटीने चांगली असते.मात्र सर्वांनाच ते शक्य नसल्याने रासायनिक खते, औषधांचा मारा केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत तूर पेरणीच्या क्षेत्रात सोयाबीनने जागा घेतली असली तरी तुरीला मिळणारा दर आणि मागणी लक्षात घेता बऱ्याच शेतकऱ्यांनी तुरीचे पेरणीक्षेत्र टिकवून ठेवले आहे. तुरीच्या पंधरा ते वीस टक्के उत्पन्नवाढीसाठी शेंडे खुडणे पद्धतीचा अवलंब करण्याची परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची सूचना आहे.
वाघ आल्याच्या अफवेने वन विभागाला फोडला घाम, औरंगाबादजवळ पळापळ
मात्र मजुरांमार्फत शेंडे खुडणे जिकिरीचे व खर्चिक असते. त्यामुळे कमी खर्चात यंत्र तयार करण्याची कल्पना प्रकाश घोडके यांना सुचली. ते मूळ राहणार आशिवचे (ता.औसा, जि.लातूर) आहेत. पत्नी उमरग्यात कृषी सहायक आहेत. ते स्वतः कृषी कृषी पदविकाधारक असून नानाजी देशमुख कृषी योजनेंतर्गत शेतीशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करतात. तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश यांनी शेंडा खुडणीसाठी यंत्र तयार केले आहे. शेतकऱ्यांना शेंडे खुडण्यासाठी या यंत्राचा चांगला होत असून आतापर्यंत ४५ शेतकऱ्यांना हे यंत्र खरेदी केले आहे.पेरणी झाल्यापासून ३५ ते ४५ दिवसानंतर तुरीचे मुख्य शेंडे खुडण्याचे काम करता येते. त्यामुळे फुटवा मोठ्या प्रमाणात होतो. त्यात फुले, फळधारणा वाढते. परिणामी एकूण उत्पन्नाच्या पंधरा ते वीस टक्के उत्पन्न वाढते. यंत्राचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. कृषी कार्यालयाशी संपर्क केल्यास यंत्र उपलब्ध होते.
(संपादन- गणेश पिटेकर)