औरंगाबाद : मॅडम, मला न्याय द्या हो...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली.

औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या महिलांनी आयोगासमोर आपल्या समस्याचा पाढा वाचत न्याय मागितला. 

सुभेदारी विश्रामगृहावर महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, महिला सहायक कक्षाच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील, समाज कल्याणच्या तुप्ती ढेरे, मनिषा पाटील, ऍड. माधूरी अदवंत, जयश्री कुलकर्णी, एच.एम.भापकर, विधी विभागाचे अधिकाऱ्या समोर समक्ष ही सुनावणी झाली. या जनसुनावणीत ग्रामीण मधूनही काही प्रकरणे दाखल झाले होते. लैगिंक शोषणाचा तीन, पोक्‍सोच्या तीन, गंभीर स्वरुपातील 3 प्रॉपटीचे 12 प्रकरण आणि कौटुंबिक स्वरूपाचे 15 प्रकरणे आले होते. यांतील बहतुांश प्रकरण मार्गी लावले. महिला आयोग, जिल्हा परिषद, पोलिस आयुक्‍त, जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभाग, विधी विभागाचे अधिकाऱ्यांच्या समक्ष या कसेसच्या सुनावण्या झाल्या. 

प्रॉपटीबाबत महिला सजग 

प्रॉपटीबाबत पूर्वीपेक्षा आता महिला सजग झाल्या आहेत. जनसुनावणीत 10 ते 12 प्रकरणे हे प्रॉपटी प्रकरणी होती. महिला आपल्या हक्‍का बाबात जागृत झाल्या आहेत. असे असेल तरी आजच्या जनसुनवणीत भावनांची गुंतवणूक असलेल्या केसेसही बघायला मिळाल्या. यासह मनोधैर्यच्या वर्षभरातील 62 केसेस दाखल झाल्या होत. त्यापैकी 22 केसेस रद्द झाले असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madam Give Justice to Us Voice of Women in Women Commission