
Manoj Jarange Patil: परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या खुनाला १८ महिने झाले तरी आरोपी अटक झालेले नाहीत. बाळा बांगर यांनी स्पष्टपणे वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचं नाव घेत आरोप केले. तरीही पोलिस काहीच करीत नव्हते. त्यामुळे महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषारी रसायन प्राशन करुन जीव देण्याचा प्रयत्न केला होता.