
Dyaneshwari Munde Case: संतोष देशमुख खून प्रकरणानंतर महाराष्ट्रात महादेव मुंडे खून प्रकरण गाजत आहे. त्याचं कारण आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे. वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरुन महादेव मुंडेंचा खून झाल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केलाय. या खून प्रकरणात वाल्मिकचा धाकटा मुलगा असल्याचा संशय आहे. हाच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा राईट हँड होता. तोच त्यांचं जगमित्र कार्यालय चालवत होता. या कार्यालयाचं नाव संतोष देशमुख खून प्रकरणातल्या चार्जशीटमध्येही आलेलं आहे.