
Beed Crime News: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास वाल्मीक कराडचा फोन आल्यामुळे थांबवण्यात आला होता, असा दावा करीत वाल्मीकसह त्याचा मुलगा श्री कराड, भावड्या कराड, गोट्या गीते व राजा फड यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली. त्यांनी याबाबत अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मुलांसह बुधवारी (ता. २३) मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.