Mahagaon Road Accident: मदतीसाठी तडफडत राहिला; गर्दी फक्त पाहत राहिली! महागावच्या २८ वर्षीय मंगेशचा उपचारादरम्यान मृत्यू; वाहनाची धडक अन्..

28 Year Old Mangesh Dies After Mahagaon Road Accident: रस्त्यावर तासभर तडफडत पडलेल्या मंगेशकडे फक्त बघ्यांची गर्दी; उशिरा मिळालेल्या मदतीमुळे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, माणुसकीवर प्रश्नचिन्ह
Mahagaon Accident Tragedy as 28 Year Old Mangesh Dies During Treatment After Unknown Vehicle Hits His Motorcycle

Mahagaon Accident Tragedy as 28 Year Old Mangesh Dies During Treatment After Unknown Vehicle Hits His Motorcycle

sakal

Updated on

-गणेश भोयर

महागाव : रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक... गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला २८ वर्षीय तरुण... मदतीसाठी सुरू असलेली त्याची तडफड... आणि घटनास्थळी जमलेली गर्दी केवळ बघ्याची भूमिका घेत राहिली. अखेर काही संवेदनशील व्यक्तींनी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मंगेश कुसुंगवार याची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताच्या ठिकाणी माणसे होती; मात्र मदतीचा हात पुढे करणारी माणुसकी उशिरा जागी झाली, अशी भावना व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com