

Devotees gather to pay their last respects to Mahant Devendra Chaitanya Swami.
esakal
पारध, : भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील प्राचीन पाताळेश्वर मंदिराचे मठपती तथा प्रसिद्ध कीर्तनकार महंत देवेंद्र चैतन्य स्वामी (वय ४१) हे रविवारी (ता. १५) सकाळी निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. दरम्यान, त्यांचा मोबाइल गायब असल्याने मोठी खळबळ उडाली.
महंत देवेंद्र चैतन्य स्वामी यांचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मूळ वास्तव्य असून, सावंगी अवघडराव येथील पाताळेश्वर मंदिराशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते.