
निलंगा (जि.लातूर) : राठोडा (ता.निलंगा) येथे महानुभाव पंथाचा चातुर्मास कार्यक्रमास आलेल्या व जवळपास २३ दिवसांपासून टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या एक हजार ३४१ साधकांना त्यांच्या मुळ आश्रमात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून मुळ गावी सोडण्याचा आदेश थेट मंत्रालयातून देण्यात आला आहे.
याबाबतची माहीती अशी की, जाधववाडी (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील जवळपास दीड हजार साधक राठोडा येथे फेब्रुवारी महिन्यात एक महिन्याभराच्या चार्तुमास कार्यक्रमास आले होते. मात्र कोरोना विषाणुला रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आल्यामुळे ती सर्व गावातच अडकून पडले होते. राठोडा या गावात महानुभाव पंथाचे दरवर्षी कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा चातुर्मासाच्या निमित्ताने नगर व पुणे जिल्ह्यातील काही साधक मोठ्या प्रमाणात आले होते.
ता.२५ फेब्रुवारीपासून ते २९ मार्चपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरी गावाच्या बाहेर कररण्यात आलेल्या प्रांगणात कार्यक्रम ठरला होता. एकवीस दिवसांच्या टाळेबंदीनंतर ती वाढवण्यात आल्याने साधक अडकून पडले आहेत. त्यांची व्यवस्था शेतामध्ये स्वतंत्रपणे करण्यात आली असली तरी त्यांचा मुळ गावाकडील आश्रमात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
चातुर्मास निमित्त जवळपास एक महिना कार्यक्रम ठरलेला होता. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अखेर काही कार्यक्रम रद्द करावा लागला. या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांकडून स्वतंत्र पंक्ती असल्यातरी त्यांच्या भोजन अथवा राहण्याची अडचण नसली तरी मूळ गावच्या आश्रमात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. नगर जिल्ह्यातील जाधववाडी येथे त्यांना त्यांच्या मूळ आश्रमात जायचे आहे. मात्र टाळेबंदी झाल्यामुळे त्यांना येथेच अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे आमच्या मुळ गावी जाण्याची विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली होती. चार दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे ती ज्या मंडपात राहत होते. ते उडून गेल्याने त्यांची गैरसोय झाली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारे साधक सामाजिक अंतर कसे पाळणार याबाबत समस्या होती. अखेर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केले होता. या साधकांना त्यांच्या मूळ गावी असलेल्या आश्रमात सोडण्यात यावेत. शासनाने दिलेल्या सर्व सूचनाचे तंतोतंत पालन करावे. शिवाय सामाजिक अंतराबरोबर एका गाडीमध्ये पन्नासपेक्षा अधिक प्रवासी ठेवू नये, मास्क, सॕनिटायझर या सर्व बाबी सूचना पाळावे असे मंत्रालतून निघालेल्या आदेशात नमुद केले आहे. महसूल व वनविभागाने ही परवानगी शुक्रवारी (ता.१७) सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी दिले आहेत. या साधकांना तब्बल २३ दिवसानंतर त्यांना त्यांच्या मुळ आश्रमात जाण्याची परवानगी मिळाल्याने त्या साधकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.