'या' भाजप महिला आमदारासह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

केज मतदार संघाच्या भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे या निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत आल्या आहेत. बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने भाजप त्यांच्यासह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

बीड : केज मतदार संघाच्या भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे या निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत आल्या आहेत. बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने भाजप त्यांच्यासह पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

बीडमधील केज मतदार संघाच्या भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी केजपासून जवळच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी उभारली. या सूतगिरणीमध्ये गणाजी सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्त केले होते. या विरोधात केज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र गुन्हा दाखल केला नाही. म्हणून फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ.विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर कलम 153 (3) अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार ठोंबरे या भाजपच्या आमदार आहेत. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार ठोंबरे यांनी दोन वर्षांपूर्वी केज येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने नवीन सूतगिरणी उभारली आहे. सूतगिरणीचे काम अद्याप सुरू आहे. याच सूतगिरणीवर संचालक म्हणून नेमलेल्या एका व्यक्तीच्या बोगस स्वाक्षऱ्या केल्याचा ठपका आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केज येथील पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला जाणार आहे. आमदार संगीता ठोंबरे या केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत, त्यांचे पती डॉ. विजप्रकाश ठोंबरे हे लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आहेत.

दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे सूतगिरणी केज'च्या संचालकपदी बोगस स्वाक्षरी करून निवडले असल्याचा आरोप करत तक्रारदार गणपती सोनप्पा कांबळे यांनी याआधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कांबळे यांच्या याचिकेवर केज दिवाणी न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. न्यायालयाने सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ.विजयप्रकाश ठोंबरे व भाजप आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra assembly election 2019 bjp mla sangeeta thombre her husband likely to booked for fraud case