Maratha Kranti Morcha : आंदोलकांचे जनावरे रस्त्यावर, जेवणही रस्त्यावर

किशन बारहाते
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण जिल्हयात वेगवेगळे आंदोलन केले जात आहेत. कुठे भजन, कुठे बैलगाड्या आडव्या लावून चक्काजाम तर कुठे रस्त्यावर झाडे आडवे टाकून आंदोलन केले जात आहे.

मानवत : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हाफाटा (ता. मानवत) येथील ग्रामस्थांनी कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर जनावरे सोडून दिले. तसेच दुपारचे जेवण देखील याच रस्त्यावर बसून केले. या आनोख्या आंदोलनात कोल्हा गावातील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण जिल्हयात वेगवेगळे आंदोलन केले जात आहेत. कुठे भजन, कुठे बैलगाड्या आडव्या लावून चक्काजाम तर कुठे रस्त्यावर झाडे आडवे टाकून आंदोलन केले जात आहे. परंतू कोल्हा (ता. मानवत) येथील ग्रामस्थांनी त्यांच्या मालकीच्या गाई, म्हशी, बैल, कारवडी राष्ट्रीय महामार्गावर सोडून दिल्या आहेत. ही जनावरे रस्त्यावरच बसून आहेत. त्याच ठिकाणी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

जनावरे रस्त्यावर सोडून आंदोलन पूर्ण न करता हजारो ग्रामस्थ दुपारीचे जेवण देखील घेऊन आले आहेत. याच रस्त्यावर बसून हजारो आंदोलकांनी दुपारचे जेवण देखील करून आंदोलनात सहभाग नोंदविला.

संबंधित बातम्या :
Maratha Kranti Morcha मराठवाड्यात कडकडीत बंद 
Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा
Maratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात
Maratha Kranti Morcha जुन्नरला सकाळपासूनच कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर
Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'
Maratha Kranti Morcha : नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा
Maratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद
Maratha Kranti Morcha परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर
Maratha Kranti Morcha अमरावतीत कडकडीत बंद
Maratha Kranti Morcha : हिंगोलीत मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद
Maratha Kranti Morcha: जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम
Maratha Kranti Morcha पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद
Maratha Kranti Morcha: औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली
Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

Web Title: Maharashtra Bandh Maratha kranti Morcha in Manvat Parbhani