

Maharashtra Farmer Relief Update 48 Lakh Marathwada Farmers Eligible for 5000 Rupees Advance Aid Before Diwali
esakal
शेंदुरवादा : राज्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शासनाने ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर दिलासा मिळाला असून, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मदतीची रक्कम जमा झाल्याचे संदेश येत आहे.