
परतूर : निराधारांना डीबीटी प्रणालीद्वारे थेट खात्यावर अनुदान देण्यासाठी लाभार्थींच्या बँक खात्याशी आधार, मोबाइल क्रमांक जोडावे लागत आहेत. डीबीटीसाठी शासनाने फेब्रुवारीअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतीत डीबीटी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे; परंतु अनेक निराधार लाभार्थींचे वयोमानानुसार आधार अपडेट होत असल्याने ते तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे तीन महिन्यांपासून अनेकांचे मानधन रखडले आहे.