

Beed Farmers News
esakal
बीड: राज्य सरकारने मोठ्या दिमाखात जाहीर केलेली कृषी समृद्धी योजना केवळ घोषणाबाजी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी एका रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही. विशेषतः बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागासाठी ही योजना संजीवनी ठरेल, अशी आशा होती. मात्र, निधीअभावी ही योजना आता फक्त नावापुरतीच उरली असून, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडली आहे.