
लोकसभेला महायुतीला नाकारणाऱ्या मराठवाड्याने विधानसभेला मात्र पुन्हा महायुतीला पसंती दिली. या विजयामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संत-महंत यांनीदेखील ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावली. मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत फार चालल्याचे दिसत नाही.