
जालना : वाळू चोरांसोबतच्या साट्यालोट्यामुळेच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. संबंध बिघडले की माफियांना अशी हिंमत येते. ही वस्तुस्थिती असून ती तपासली जाणार आहे. आता यापुढे अधिकाऱ्यांचे साटे-लोटे आढळून आले तर थेट बडतर्फ केले जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता. आठ) जालन्यात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.